चार लाख
- Aug 25, 2023
- 1 min read

रसिक हो नमस्ते.
परवाच भारताने चंद्रावर आपला झेंडा फडकवला. चांद्रयान-२ चे अपयश विसरायला लावले आणि कसून तयारी करत, चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिणध्रुवावर उतरवलेच. या भागात यान उतरवणारा भारत हा पहिला आणि एक मात्र देश ठरला आहे. इस्रोच्या सर्व टीमचं हे यश कौतुकास्पद आहे. आम्हाला तुमचा अभि
मान आहे.
मराठी रेडिओ तरंग या वेबसाईटला भेट देणाऱ्यांची आजवरची संख्या आता चार लाखाचा आकडा पार करून पुढे गेली आहे. तुमच्या या अलोट प्रेमामुळे आम्हीही चार चांद लावले असे आम्हास वाटू लागले आहे.
रसिक हो, धन्यवाद. असाच तुमचा स्नेह व प्रेम कायम राहू दे.

हा बाजूचा चार्ट म्हणजे गेल्या आठवड्यात रेडिओ मराठी तरंग ऐकणाऱ्या श्रोत्यांची संख्या आहे.
Comments